अजिंठा । रावेर आगाराच्या पुणे रावेर बसचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटात भीषण अपघात झाला. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली असून या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मतदकार्य सुरू केले.
या अपघातामधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी अजिंठा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, काही जणांना खासगी रुग्णालयाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक असे की, रावेर आगारातील बस क्रमांक (एमएच ४० वाय ५१९७) ही बस पुणे ते रावेर असा प्रवास करत असतांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटातील फारेस्ट गेट समोरून बस जात असतांना समोरून मालवाहू टेम्पो क्रमांक (एमएच २० जीसी ७८४०) ला दुसरी बस ही तिच्या मागून ओव्हर टेक करत होती. त्यावेळी पुणे-रावेर बसवरील चालक योगेश तायडे यांचे बसवरील ताबा सुटला. त्यामुळे धावती बस रस्त्याच्या पलीकडे जावून ७ फूट खाली जावून पटली झाली.
या बसमध्ये एकुण ७२ प्रवाशी होते. त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंत अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तसेच जखमींचे नावे देखील समोर आलेले नाही. या संदर्भात जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.















Discussion about this post