यावल : तालुक्यातील आमोदा येथील प्राचीन लाकडी श्रीराम मंदिराला भीषण आग लागली असून या आगीत मंदिरावरील जिल्हा बँक शाखाही जळून खाक झाली. या आगीत मोठे नुकसान झाले असून आठ बंबांनी आज पहाटे दोन वाजेपर्यंत पूर्ण आग आटोक्यात आणून विझवली.
याबाबत असे की, आमोदा या गावात प्राचीन श्रीरामचं मंदिर असून हे मंदिर पूर्ण लाकडी आहे. या मंदिराच्या वरच्या मजल्यावर जिल्हा बँकेची शाखा सुद्धा आहे.गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे या मंदिराला आग लागली व पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले.
या आगीत मंदिराच्या वर असणारी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.फैजपूर, सावदा, रावेर, यावल, भुसावळ या ठिकाणच्या सुमारे आठ बंबांनी पहाटे दोन वाजेपर्यंत पूर्ण आग आटोक्यात आणून विझवली. या सर्व आगीमध्ये मंदिर आणि बँक दोघांचे अंदाजे २ लाखांच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत याबाबत, फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्याचे काम सुरू होते.















Discussion about this post