Sunday, March 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भाजपा व आरएसएस आरक्षण विरोधी, मोदींची पुन्हा सत्ता आली तर.. ; नाना पटोले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 1, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
भाजपा व आरएसएस आरक्षण विरोधी, मोदींची पुन्हा सत्ता आली तर.. ; नाना पटोले
बातमी शेअर करा..!

मुंबई । काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला. भाजपाने जाती धर्माच्या नावावर भांडणे लावून सामाजिक शांतता बिघडवण्याचे पाप केले. लोकसभेची ही निवडणुक देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची केंद्रात सत्ता आणा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

भाजपा सरकारवर टीका करत नाना पटोले म्हणाले की, भाजपने मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले पण त्यांनी आरक्षण दिले नाहीच उलट राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला. भारतीय जनता पक्ष व आरएसएस हे आरक्षण विरोधी आहेत. नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता आली तर ते संविधान बदलणार व संविधानाने दिलेले आरक्षणही संपवणार. भाजपने २०१४ साली खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली, २०१९ मध्ये पुलवामा येथे हल्ल्यात ४० जवान शहिद झाले, हा हल्ला कोणी त्याचा तपास आजही लागलेला नाही. मोदी सरकारने जीएसटीच्या माध्यमातून जनतेकडून वसुली केली व अदानी, अंबानीचे घर भरले. कांदा निर्यात बंदी उठवताना गुजरातची उठवली पण महाराष्ट्रातील कांदा निर्यातला परवानगी दिली नाही. भाजपा सरकारने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले. राम मंदिर उद्घाटन व संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी असल्याने भाजप सरकार व नरेंद्र मोदी यांनी आमंत्रण न देऊन त्यांचा अपमान केला, असेही नाना पटोले म्हणाले.

काँग्रेसने जनतेला गॅरंटीकार्ड दिले आहे, गरिब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार, ३० लाख सरकारी रिक्त पदे भरणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, एमएसपीचा कायदा आणणार, शेती जीएसटी मुक्त करणार, जातनिहाय जनगणना करणार आहे असे नाना पटोले यांनी सांगितले.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरात झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेत सामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल भाष्य करण्यात आले नाही. २०१४ च्या निवडणुकीत मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीतून मेट्रोचे कोच तयार करू असे भाजपवाले म्हणाले होते, 2019 ला त्याच फॅक्टरीतून बुलेट ट्रेन कोच तयार करू असे म्हणाले आणि आता 2024 ला ते त्या फॅक्टरीतून वंदे भारत कोच तयार करू असे म्हणतात पण महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे खासदार म्हणून या फॅक्टरीतून कोच बाहेर काढतील. नांदेड अहमदपूर रेल्वे विकसित झाली पाहिजे, रोकडा सावरगाव पर्यंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता करू, या परिसरातील ऊस मांजरा परिवार घेऊन जाईल. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करा आणि ७ मे रोजी डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हाताच्या चिन्हाचे बटन दाबून विक्रमी मताधिक्याने विजयी करा असे आवाहन देशमुख यांनी केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आठ दिवसांपासून जळगावची महिला बेपत्ता ; चार महिन्याचा तान्हुला आईच्या दुधासाठी व्याकूळ

Next Post

5 पंतप्रधान.. हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला? शरद पवारांचा टोला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सरकारला किंमत मोजावी लागेल ;खासदारांच्या निलंबनानंतर शरद पवार आक्रमक

5 पंतप्रधान.. हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला? शरद पवारांचा टोला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

नागरिकांनो काळजी घ्या ! महाराष्ट्रात उष्णेतेच्या लाटेचा इशारा; आज कुठे कसं हवामान?

March 8, 2026
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page