मुंबई : या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. सोन्या आणि चांदीच्या दरातील घौडदौडीने ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले होते, ज्याचा परिणाम विक्रीवरही झाला. परंतु आता सोन्या आणि चांदीच्या किमतीतील स्वस्ताईने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रति तोळा भाव ६० हजार रुपयांच्या खाली असल्याने ग्राहक पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे वळत आहेत.
आज खरेदीला जाण्यापूर्वी तुम्ही सोन्या-चांदीचा नवीन भाव जाणून घ्या. शुक्रवारी सोन्याचा भाव सपाट व्यवहार करत आहे, तर चांदीच्या किमतीत ०.१८% वाढ नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचे ऑगस्ट फ्युचर्स ५९ हजार ८९३ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत असून इंट्राडे नकारात्मक क्षेत्रात घसरल्यामुळे भाव दोन रुपयांनी वाढले. दुसरीकडे, एमसीएक्सवर चांदीचा जुलै फ्युचर्स १३२ रुपयांनी वाढून ७३,८०२ रुपये प्रति किलो या पातळीवर व्यवहार करत आहेत.
दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार सराफा बाजारात ९ जून रोजी सोने आणि चांदीची किंमत अनुक्रमे ५५ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि ७३ हजार ४०० रुपये प्रति किलो आहे. मुंबई, कोलकाता, केरळ आणि हैदराबादमध्ये २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५,२००० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,२२० रुपये आहे.
भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याचे दर
मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,०२२ रुपये प्रति ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची किंमत ५५,५२० रुपये प्रति ग्रॅम आहे.
नवी दिल्लीत २४ कॅरेट दागिन्यांचे सोने प्रति ग्रॅम ६०,०३७ रुपये आणि २२ कॅरेट दागिन्यांचे सोने ५५,५३५ रुपये प्रति ग्रॅमने विकले जात आहे.
पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,०२२ रुपये प्रति ग्रॅम तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५,५२० रुपये प्रति ग्रॅम आहे.















Discussion about this post