सध्या राज्यासह देशातील अनेक ठिकाणी सूर्य आग ओकत आहे. वाढत्या उकाड्यामुळे लोक हैराण झाले. उन्हाळ्यात अनेक प्रकारचे थंड आणि आरोग्यदायी पेयांचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. यातच पुदिना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून उन्हाळ्यात त्याचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर आहे.
पुदिन्यात असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, थायमिन, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म शरीराला अनेक फायदे देतात. उन्हाळ्यात अनेक पेयांमध्ये पुदिनाही टाकला जातो. त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का? याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊया पुदिन्याचे पाणी पिण्याचे आरोग्याला होणारे फायदे.
मळमळ
जर तुम्हाला मोशन सिकनेस किंवा मळमळ होत असेल तर उन्हाळ्यात (Summer Season) याचे सेवन करा. पुदिन्याचा गुणधर्म थंड असल्यामुळे आपल्याला आराम मिळतो.
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म
पुदीन्यामध्ये मेन्थॉल आणि रोझमॅरिनिक ऍसिडसारखे अँटिऑक्सिडंट आढळतात. जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करतात.
रोगप्रतिकारशक्ती
पुदिन्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह भरपूर असते. जे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत होते.
ताण
तणाव कमी करण्यासाठी पुदिन्याचे पाणी फायदेशीर आहे. त्यामुळे हे प्यायल्याने आराम मिळतो. यात असणारे गुणधर्म आरोग्याला बहुगुणी ठरतात.
(टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा)
Discussion about this post