पुणे : मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. ती म्हणजे मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळं १६ जूननंतर मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. पण हवामानात मोठे बदल झाला आहे. तब्बल
एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं आगमन झालेलं आहे.
आज केरळमध्ये मान्सूननं हजेर लावली असून राज्यात लवकरच दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Discussion about this post