नवी दिल्ली । उत्तम आरोग्यासाठी गाईचं दूध अत्यंत पौष्टिक मानलं जातं. लहान मुलांना गाईचं दूध देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र याच दूधावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.गाईच्या दुधात जीवघेणा व्हायरस आढळल्याची मोठी बातमी समोर आलीय. या व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOनं धोक्याचा इशारा दिलाय.
अलिकडच्या काळात देशी गाईच्या दुधाला प्रचंड मागणी वाढलीय. मात्र याच दूधावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कारण गाईच्या दुधातच जीवघेणा व्हायरस आढळलाय. गाईच्या दुधात H5N1 बर्ड फ्लू व्हायरस आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. या व्हायरसमुळे WHOनं धोक्याचा इशारा दिलाय.
WHOनं दिलेल्या माहितीनुसार गाईच्या दुधात H5N1 बर्ड फ्लू व्हायरस आढळून आलाय. संक्रमित जनावरांच्या दुधात हा व्हायरस सापडलाय. 1996 ते 2020 या दरम्यान मोठ्या प्रमाणात प्राणी आणि पक्षांना या व्हायरसची लागण झालीय. टेक्सासमध्ये एका गोठ्यात काम करणा-या व्यक्तीला व्हायरसची लागण झालीय. संशोधकांनी या व्हायरसवर संशोधन सुरू केलंय. तसच इतर जनावरांमध्येही याची लागण झालीय का? याचा शोध घेतला जातोय.
गाईच्या दुधात सापडलेला व्हायरस मानवी आरोग्यासाठी कितपत घातक आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शिवाय भारतात असा कोणताही व्हायरस आढळून आलेला नाही. हा व्हायरस अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये आढळून आलाय. त्यामुळे लोकांनी लगेचच घाबरून जाण्याचं कारण नाही.
Discussion about this post