नवी दिल्ली: सलग १२ वर्षे जगातील सर्वश्रेष्ठ विमानतळाचा किताब पटकावणाऱ्या सिंगापूरच्या चांगी विमानतळास यंदा कतारची राजधानी दोहा येथील हमाद विमानतळाने मात दिली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील ‘ऑस्कर’ समजल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डस’च्या १३ व्या वर्षी हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दिल्ली विमानतळ ३६ व्या स्थानी
जगातील १०० सर्वश्रेष्ठ विमानतळांच्या यादीत भारतातील ४ विमानतळांचा समावेश झाला असून ५० सर्वश्रेष्ठ विमानतळांच्या यादीत केवळ एकमेव दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळाने जागा पटकावली आहे. आयजीआय विमानतळ ३६ व्या स्थानी आहे. गेल्या वर्षीही ते याच स्थानावर होते. मुंबईतील विमानतळ ९५ व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी ते ८४ व्या स्थानी होते. बंगळुरू विमानतळ ६९ व्या स्थानावरून ५९ व्या स्थानावर झेपावले आहे. हैदराबादचे विमानतळ ६५ व्या स्थानावरून ६१ व्या स्थानी आले आहे
टॉप-५ विमानतळे कोणती?
हमाद विमानतळ (दोहा)
सिंगापूर
सियोल इंचियोन
हानेडा (टोकियो)
नारिता विमानतळ