मुंबई : सध्या सगळीकडे लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसानंतर पार पडणार आहेत. तरी देखील राज्यातील महायुतीकडून काही जागांवरचा तिढा सुटता सुटत नाहीय. दरम्यान, यातील सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून मात्र या जागेवर शिवसेनेकडून दावा केला जात असल्यामुळे अद्याप उमेदवारी जाहीर केली गेली नाही. परंतु नारायण राणे यांनी प्रचार सुरु केला आहे. आता या प्रचार दरम्यान नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दमच भरला आहे.
सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना आमदार नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दम दिला आहे. ते म्हणाले की. सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता लावा.
येत्या ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसं लीड मिळालं नाही तर मागणी असलेला निधी मिळणार नाही. मग मात्र माझी तक्रार करू नका, असा दम नितेश राणे यांनी भरला.