जळगाव । राष्ट्रवादी शरदचंद्र पवारमधील महिला नेत्या असलेल्या एका लेकीने वडिलांनी वेगळा निर्णय घतल्याने आपल्या फेसबुक प्रोफाईलमधून वडिलांचा फोटो हटवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी फेसबुक प्रोफाईलमधून एकनाथ खडसेंचा फोटो हटवला आहे. वडील एकनाथ खडसे यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं रक्षा खडसेंनी निर्णय घेतला आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. रोहिणी खडसे यांनी आपला निर्णय दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना पुण्यात जाऊन कळविल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा आपल्या फेसबुक प्रोफाईल मधील फोटो हटवला आहे.
रोहिणी खडसे यांनी आता ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षासोबत काम करण्याची भूमिका घेतली आहे सूत्रांच्या माहितीनुसार रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्याचं दिसतंय. कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नाही, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.















Discussion about this post