नवी दिल्ली । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा वाढला आहे. कारण केजरीवालांना दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अरविंद केजरीवाल यांची याचिका उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली आहे. न्यायमूर्ती स्वरकांता शर्मा यांनी न्यायालयात हा निकाल दिला आहे.
निर्णय वाचताना न्यायाधीश म्हणाले की, हा अर्ज जामिनासाठी नसून केजरीवाल यांनी आपल्या अटकेला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने म्हटले आहे की, ईडीने गोळा केलेल्या पुराव्यांवरून अरविंद केजरीवाल यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे दिसून येते. केजरीवाल यांनी लाचखोरी प्रकरणात सक्रिय भूमिका बजावल्याचे पुराव्यावरून दिसून येते.
न्यायालयाने म्हटले आहे की, साक्षीदारांशी साक्ष न्यायालयाने लिहिलेली आहे, ईडीने नाही. तपास कोणाच्याही सोयीनुसार होऊ शकत नाही. कागदपत्रानुसार केजरीवाल या कटात सामील आहेत. साक्षीदारांवर संशय घेणे म्हणजे न्यायालयावर संशय घेण्यासारखं आहे. सरकारला जबाबदार धरले जाईल की नाही हे न्यायालय ठरवते. दरम्यान, मागणीला सुनावणीत अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयाकडे अंतरिम जामीन मागितला होता. ज्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने 3 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सुनावणीत निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. केजरीवाल यांनी 23 मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. त्यांना 21 मार्च रोजी दिल्लीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती.















Discussion about this post