मुक्ताईनगरः चारठाणा शिवारातील मदापुरी या आदिवासी गावातील शेतकऱ्याच्या शेतातील केळीची खोडं घडासकट कापून फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाईची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
पुरण मांगीलाल भोसले या आदिवासी शेतकऱ्याची शेती सुरेश हिराबन्सी पवार या शेतकऱ्याने केलेली आहे. या शेतात केळी लावली आहे. दि. ३ एप्रिलला रात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञाताने शेतात घुसून सुमारे ५० ते ६० खोडं घडासकट कापन फेकले सकाळी पवार हे शेतात गेले असता घडलेला प्रकार निदर्शनास आला. याबाबत शेतकरी पवार यांनी कुन्हा पोलिस दूरक्षेत्र कार्यालयात तक्रार केली आहे
दरवर्षीच होतो हा प्रकार
केळी बागेतील खोडं कापण्याचा हा प्रकार दरवर्षी होतो. लहानसहान भांडणाचा वचपा काढण्यासाठी अशाप्रकारे बऱ्याच वेळा काहींच्या बागेतील केळीचे घड आणि खोडं कापण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी मदापुरी गावात आपसात वाद झाला होता. याबाबत पोलिसांतसुद्धा वारंवार तक्रारी केल्याचे शेतकऱ्याने सांगितले. तसेच रात्री बेरात्री शेतात जावे लागत असल्याने जीवितास धोका संभवतो, अशी भीतीदेखील व्यक्त केली. कुन्हा पोलिस चौकीचे पोलिस नाईक प्रदीप इंगळे, पो. कॉ. सागर सावे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
Discussion about this post