एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाकडून काल हकालपट्टी केल्यानंतर आज काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम आणि काँग्रेसमधील वाद समोर आला होता. त्यानंतर संजय निरुपम यांची स्टार प्रचारकांच्या यादीतून गच्छंती करण्याचा निर्णयही काँग्रेसने घेतला होता.
अशातच काल राज्यातील पक्षाच्या कार्यकारिणीने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी शिफारस केली होती. त्यानंतर काँग्रेस नेते के.सी वेणुगोपाल राव यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी होत असल्याचे पत्रातून सांगितले होते. या हकालपट्टीनंतर संजय निरुपम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे
Discussion about this post