चाळीसगाव । सोने-चांदीच्या खरेदीपोटी दिलेला धनादेश बँकेत न वटल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच फिर्यादीस भरपाई म्हणून २० लाख रुपये देण्याचा आदेश दिला. ही रक्कम विहीत मुदतीत न्यायालयात जमा न केल्यास अधिकची सहा महिन्यांच्या कारावासाचीही शिक्षा सुनावली आहे.
चाळीसगाव येथील ललित अभय सोनार यांनी शहरातील सोने-चांदीचे व्यापारी मनोज सुभाषचंद जैन यांच्याकडून १७ लाख ५० हजारांच्या सोन्या-चांदीची खरेदी केली होती. त्याबदल्यात ललित सोनार यांनी मनोज जैन यांना धनादेश दिले होते. दिलेल्या तारखेला बँकेत धनादेश वटले गेले नाही. त्यामुळे मनोज जैन यांनी ललित सोनार यांच्याविरोधात येथील न्यायालयात खटला दाखल केला होता.
त्यामुळे ललित सोनार हे मनोज जैन यांना केवळ १२ लाख ५० हजार देण्यासाठी पात्र असल्याचा बचाव ललित सोनार यांनी केला होता.. मात्र, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर येथील न्यायाधीश ए. एच.. शेख यांनी सोनार यांना सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच ललित सोनार यांनी मनोज जैन यांना ३० दिवसांच्या आत २० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून अदा करावेत, असा निकाल देत ही रक्कम न दिल्यास ललित सोनार यांना आणखी सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात फिर्यादी मनोज जैन यांच्यातर्फे अॅड. समीर शेख व अॅड. अश्विनी चावरे यांनी कामकाज पाहिले.
सोनार यांनी मनोज जैन यांना पाच लाख रुपये दिल्याचे न्यायालयाला सांगितले.
Discussion about this post