जळगाव । जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटीलचं तिकीट कापण्यात आले आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, तिकीट कापल्याने नाराज असलेले भाजपचे खासदार उन्मेष पाटील आता उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.यावर भाजपच्या उमेदवार स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच भाजपच्या विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाल्या स्मिता वाघ ?
संजय राऊत हे उन्मेश पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उन्मेश पाटील हे गेले आहेत. त्यामुळे मला अजूनही असं वाटत नाही की उन्मेश पाटील हे असा काही निर्णय घेतील. मी आज प्रचारांमध्ये आहे. त्यामुळे मी अशी कुठली बातमी बघितली नाही. मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी घडणार नाहीत. उन्मेश पाटील भाजपमध्येच राहतील, असं स्मिता वाघ म्हणाल्या.
तरीही भाजपच जिंकणार- वाघ
कोणी कसं जीवन जगावं, हा ज्याचा त्याचा व्यक्ती प्रश्न असतो. मात्र मी माझ्या तत्वांशी आजपर्यंत तडजोड केली नाही. मी एकनिष्ठ राहिले. पक्षासोबत एक निष्ठा राहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्ते च्या पाठीशी जनता ही उभी राहील. भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले आणि ते स्वतः उमेदवार असले तरी जनता माझ्या पाठीशी राहील असा मला विश्वास आहे, असं स्मिता वाघ म्हणाल्या.
Discussion about this post