जळगाव । जळगाव जिल्ह्यातील राजकारणातून एक मोठी समोर येत आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे देखील ठाकरे गटात उद्या बुधवारी प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे एन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसणार आहे.
उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे खासदार आहेत. त्यांनी याआधी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते. मात्र यावेळी उन्मेष पाटील यांना भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळता स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा होती. याच नाराजीतून त्यांनी आज ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे.
महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटासाठी सुटला आहे. ठाकरे गटाकडून या जागेसाठी उमेदवाराची घोषणा झालेली नाही. दरम्यान, उन्मेष पाटील आणि करण पवार हे जर शिवसेना ठाकर प्रवेश करत असतील तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून नेमकी उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून कोणाला मिळते ते पाहावे लागेल.
Discussion about this post