जळगाव । राज्य मार्ग परिवहन सेवेतून निवृत्त झालेल्या, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वयाच्या ७५ वर्षांपर्यंत जुलै ते फेब्रुवारी कालावधीत अखंड सहा महिने मोफत बस प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. तसेच स्लीपर कोच बसमध्येही प्रवास करता येईल; परंतु त्यासाठी भाडचाच्या फरकाची रक्कम भरावी लागणार आहे. परिवहन महामंडळाकडून बस प्रवासाच्या सुधारित सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.
सुधारित परिपत्रकानुसार सेवानिवृत्त, वैद्यकीयदृष्टया अपात्र असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना वयाच्या ७५ वर्षापर्यंत प्रतिवर्षी सहा महिने मोफत बस प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांच्या पती, पत्नीसही वयाच्या ७५ वर्षांपर्यंत दरवर्षी सहा महिने मोफत बससेवेचा लाभ घेता यईल. यातच कर्मचाऱ्याच्या विधवा, विधूर पत्नीलाही मोफत बससेवेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, एसटीच्या मोफत पासवर साध्या बसमध्येच प्रवास करता येत होता.
आता महामंडळाने शिवशाहीच्या स्लीपर, शिवनेरीसह इतर सगळ्या बसेसमध्ये फरकाची रक्कम भरून प्रवासासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे महामंडळाची ही योजना सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.
Discussion about this post