जळगाव । जळगाव जिल्ह्यातून एक अनपेक्षित बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा आज सोमवारी मुक्ताईनगर येथे अपघात झाला. जुना कुंड रस्त्याने जात असताना काही शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी भेटण्यासाठी थांबले होते. त्यावेळी पाटील यांच्याच ताफ्यातील पोलिसांची गाडी त्यांच्या कारवर आदळली.
या अपघातात चंद्रकांत पाटील हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची प्राथनिक तपासणी केली. चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारीदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनादेखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासह सुरक्षा वाहनातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुर्घटनेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मुक्ताई नगरवरून आम्ही जुना कुंड रस्त्याने जात असताना काही शेतकरी आपल्यासाठी रस्त्यावर थांबून होते. त्यांना पाहून आपण चालकाला आपली गाडी थांबविण्यास सांगितले. आमची गाडी रस्त्यावर थांबली होती. मात्र, त्यावेळी आमच्याच ताफ्यामध्ये असलेली सुरक्षारक्षकांच्या गाडीचा ब्रेक न लागल्याने ती आमच्या कारवर जोरात आदळली. यामध्ये मला आणि तीन पोलीस कर्चमाऱ्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुक्ताईनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
Discussion about this post