मुंबई : एकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणने आपल्या वीज ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. आजपासून महावितरणच्या वीज दरात वाढ करण्यात आली आहे. वीज बिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आजपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत.
आजपासून वीजबिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
आधीच वाढलेले जीवनावश्यक वस्तुंच्या खर्चामुळे सामान्य माणसाचे पुरते कंबरडे मोडले आहे. यातच महावितरणने वीज दरवाढ करून ग्राहकांना मोठा आर्थिक फटका दिला आहे. आधीच देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज सर्वात महाग आहे. तरीही महावितरणने दरवाढ करून ग्राहकांना झटका दिला यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.
Discussion about this post