धुळे : धुळे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. मात्र यावेळी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहण्यास मिळाले. अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमातच हा वाद उफाडून आला.
मंत्री अनिल पाटील उपस्थित असताना भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी यांच्यासमोर कैफियत मांडत नाराजी व्यक्त केली आहे. कुठल्याही कार्यक्रमासंदर्भात शहर अध्यक्षांना कुठलीही कल्पना दिली जात नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
धुळ्यात पक्षाच्या होत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात शहर अध्यक्षांनाच विश्वासात घेतले जात नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे धुळ्यात पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे बघावयास मिळाले आहे,
Discussion about this post