एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून परंतु अशातच शरद पवार भाजपला मोठा धक्का देणार आहे. अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदावारी न दिल्यामुळं मोहिते पाटील कुटुंब नाराज आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं या मतदारसंघात मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत
त्यामुळे मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. उद्याच धैर्यशील मोहिते पाटलांना प्रवेश देवून त्यांची माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.















Discussion about this post