मुंबई । लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्याआधीच अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रायगडच्या जागेवर सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा अजित पवारांनी केली आहे. मात्र बारामती मतदारसंघाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.
पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले अजित पवार?
“आम्ही एकत्रपणे चर्चा करुन जवळपास महायुतीच्या 48 जागांबद्दल महाराष्ट्रात कुणी कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल ठरवलं आहे. जवळपास 99 टक्के काम पूर्ण केलेलं आहे. फक्त आमचं ठरलं आहे की, 28 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे बसून मुंबईला पत्रकार परिषद घेऊ. आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
“मी आज पहिल्यांदा रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवार जाहीर करतो. सुनील तटकरे तिथे महायुतीचे उमेदवार असतील. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, तसेच रामदास आठवले, कवाडे, सदाशिव खोत, रासपचे महादेव जानकर, विनायक गोरे, सचिन असे सगळे सहकारी मिळून आम्ही महाराष्ट्रातील 48 जागा लढवत आहोत. काहींनी फॉर्म भरले आहेत. विदर्भात पहिल्या टप्प्यात निवडणुका आहेत. इतर जागांबाबत 28 तारखेला माहिती देईन”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
आढळराव पाटील आज सायंकाळी अजित पवार गटात प्रवेश करणार. २० वर्षांनंतर पाटील यांचा शिरूरमध्ये पक्षप्रवेश होत आहे. शिरूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याचंही ते म्हणाले
Discussion about this post