जळगाव | राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारीसह पालिकांच्या उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित, बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विशाल नरवाडे आणि धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी शुभम गुप्ता, आएएस अधिकारी संजय मीना, अमित सैनी यांची तडकाफडकी बदली केल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यानंतंर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पण या बदल्या निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर करण्यात आल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका योग्य पद्धतीने पार पडाव्यात म्हणून देशभरातील काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले होते.
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.















Discussion about this post