ब्रेकिंग । देशात लोकसभा निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेनुसार देशात एकूण 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला मतदान होणार असून वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि टप्प्यांत 1 जूनपर्यंत मतदान चालणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
देशात 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असून, 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीची पहिली फेरी १९ एप्रिलला
26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका
तिसऱ्या टप्प्यातील मतदान 07 मे रोजी होणार आहे.
13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील निवडणुका
20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील निवडणुका
25 मे रोजी सहाव्या टप्प्यातील निवडणुका
01 जून रोजी सातव्या टप्प्यातील निवडणुका















Discussion about this post