धुळे । अंगणवाडीतील सुमारे सात विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातुन समोर आलीय. या घटनेतील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून या सर्व विद्यार्थ्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनूूसार आज शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे खिचडीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर 6 ते 7 विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. खिचडीतून विषबाधा झाल्याचा संशय आल्याने विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले
या घटनेतील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य विद्यार्थ्यांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. दरम्यान या प्रकाराची चाैकशी करुन दाेषींवर कारवाई करण्याची मागणी पोषण आहार समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे.















Discussion about this post