जळगाव । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हिम्मत असले तर खडसेंनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी असे आव्हान संजय पवारांनी दिल.
खरंतर एकनाथ खडसेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांचा भाजपसोबत गेल्याने त्यांचा सन्मान राहिला नाही त्यांना तीन जागांवरच समाधान मानावे लागत आहे, असं खडसे म्हणाले होते. यावर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेत खडसेंवर जोरदार निशाणा साधला
एकनाथ खडसे यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी विधान परिषदेत दिलेल्या मताचा त्यांनी राजीनामा द्यावा, मग अजित पवाराच्या सन्मानाची भाषा करावी. एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या सुनेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांना धोका दिला शरद पवारांना अंधारात ठेवलं त्यांना फसवलं त्याच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा निवडणुकी लढवावी असं पवार म्हणाले. अजित पवार यांनी 45 50 आमदार घेऊन बाजूला झाले आहे एकनाथ खडसे यांचा सारखा धोका त्यांनी दिला नाही.
खडसे यांनी मंदा खडसे यांना चेअरमन रोहिणी खडसे यांना चेअरमन रक्षा खडसे यांना खासदार स्वतःच्याच घरात सर्वे पदे त्यांनी घेतली. अजित पवार यांनी 45 50 आमदार घेऊन बाजूला झाले आहे एकनाथ खडसे यांचा सारखा धोका त्यांनी दिला नाही असाही निशाणा संजय पवारांनी साधला















Discussion about this post