चाळीसगाव । चाळीसगावातून एक दुर्दैवी घटना घडली. अडीच वर्षीय बालकाचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली समर्थ सागर पाटील (दोन वर्ष सहा महिने, तुळसाई नगर, टाकळी प्र.चा.)असे मृत बालकाचे नाव असून याबाबत डंपर चालकाविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकी घटना काय?
शहराजवळील टाकळी प्र.चा. येथे तुळसाई नगर असून मोकळ्या भूखंडाच्या जागेवर सभा मंडपाचे काम सुरू आहे. या कामासाठी खडीने भरलेला डंपर (क्रमांक एम.एच.46 बी.बी.8067) हा शुक्रवारी सायंकाळी आल्यानंतर खडी खाली केल्यानंतर डंपर मागे घेतला जात असताना अडीच वर्षीय समर्थ त्याखाली आल्याने त्याच्या अंगावरून डंपरचे चाक जाताच जागीच त्याचा करुण अंत झाला.
अपघातानंतर घटनास्थळावरून डंपर चालक पसार झाला. या प्रकरणी विनोद विठ्ठल गुजर (34, टाकळी प्र.चा.) यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक (नाव, गाव माहित नाही) विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रमेश पाटील करीत आहेत.
Discussion about this post