नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून देशातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असून यातच आता सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात केली. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला
नवीन दर आज 15 मार्चपासून लागू झाले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सोशल मीडियावरून गुरुवारी रात्री हा निर्णय जाहीर केला. नव्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर १०६.३१ रुपयांवरून १०४.२० रुपयांपर्यंत कमी होतील, तर डिझेलचे दर ९४.२७ रुपयांवरून ९२.१५ रुपये प्रतिलिटर कमी होतील. यापूर्वी केंद्र सरकारने एप्रिल २०२२ मध्ये पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी ८ रुपयांनी तर डिझेलवरील कर ६ रुपयांनी कमी केला होता. २३ महिन्यांनतर आता पुन्हा हे इंधन स्वस्त झाले आहे.















Discussion about this post