जळगाव । रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र दुसरीकडे यामुळे भाजपचे पदाधिकारी नाराज झाले. रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने यावल व रावेर तालुक्यातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे सामूहिक राजीनामे देत संताप व्यक्त केला.
रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांचं तिकीट जाहीर झाल्याने रावेर लोकसभेतील भाजप इच्छुक एक गट नाराज झाला. रावेरमधून इच्छुक उमेदवार जिल्हाध्यक्ष अमोल सावळे यांचे तिकीट कापल्याने हा नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे.
रावेरच्या भालोद इथे हजारो भाजपाचे कार्यकर्ते जमा होऊन नाराजी व्यक्त केली. सामूहिक अनेक जण भाजपचा राजीनामा या ठिकाणी देत आहेत, असं पत्र समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हे पत्र लिहिण्यात आलं आहे. आज रावेर लोकसभेची जागा जाहीर झाली अमोल जावळे यांना डावलण्यात आलं. पुन्हा अन्याय झाल्याने लोकसभा मतदारसंघात आम्ही यापुढे भाजपाचे काम करणार नाही, अशा आशयाचे सामूहिक सक्षरी करण्याचे मोहीम सुरू झाली आहे.















Discussion about this post