जळगाव : जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी जवळील गिरणा नदीवर असलेल्या पुलावरून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्ञानेश्वर गोविंदा नन्नावरे (वय ४५) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र ही आत्महत्या आहे की काही दुर्घटना याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.
जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर जळगावपासून जवळ असलेल्या गिरणा नदीच्यापुलावर ही घटना घडली आहे. गिरणा नदीवरील पुलावरून नदीपात्रात कुणीतरी पडल्याचे दिसून आल्याने वाहन धारकांसह गुरे चारणाऱ्यांनी धाव घेतली. पुलावरुन पडलेला व्यक्ती बांभोरी प्र.चा. (ता. धरणगाव) येथील ज्ञानेश्वर नन्नावरे असल्याचे ओळखले.
या घटनेबाबत ग्रामस्थांनी तालुका पोलिस आणि पाळधी औटपोस्टला कळवल्यानंतर दोन्ही पोलिस ठाण्यातून पोलिस पोहचले. घटना तालुका पोलिसांच्या हद्दीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Discussion about this post