चोपडा | तालुक्यातील सातपुड्यातील मेलाणे गावात मक्याच्या शेतात लागवड केलेला ३९ लाख २० हजार रुपये किमतीचा ९८० किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या प्रकरणी शेतमालक अर्जुन सुमाऱ्या पावरा ( वय ५०) या संशयितास पोलिसांनी केली आहे.
तालुक्यातील मेलाणे शिवारात गांज्याची शेतात लागवड होत असल्याच्या गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशन च्या सहकार्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मेलाणे शिवारात धडक दिली. दि.13 रोजी पहाटेच्या सुमारास मेलाणें शिवारातील मक्याच्या शेतात अंतर पिकात गाज्यांची लागवड दिसून आला. गांजाची कापणी करून त्याची रात्री उशिरापर्यंत मोजणी करण्यात आली. हा संपूर्ण गांजा ९८० किलो इतका असून शेत मालक व मुख्य आरोपी अर्जुन सुमारा पावरा याला अटक करण्यात आली आहे.
Discussion about this post