केंद्रीय लोकसेवा आयोगाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये वैयक्तिक सहाय्यकाच्या 323 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. गट ब अराजपत्रित पदाच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर सुरू झाली असून उमेदवार 27 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. अनारक्षित प्रवर्गासाठी 132, ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 32, ओबीसीसाठी 87, एससीसाठी 48, एसटीसाठी 24 आणि दिव्यांगांसाठी 12 पदे रिक्त आहेत.
आवश्यक पात्रता?
मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी. आणि स्टेनो आणि टायपिंगचे ज्ञान.
1. स्टेनोग्राफी – 10 मिनिटांत 120 शब्द प्रति मिनिट या वेगाने श्रुतलेखन. (इंग्रजी किंवा हिंदी)
2. डिक्टेशन ट्रान्सक्रिप्शन वेळ – 50 मिनिटे (इंग्रजी)/ 65 मिनिटे (हिंदी) (केवळ संगणकावर)
वयोमर्यादा- १८ वर्षे ते ३० वर्षे.
ओबीसी प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची आणि एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची सूट मिळेल.
निवड – लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी. लेखी परीक्षेत इंग्रजी भाषा, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड या विषयांवर प्रश्न विचारले जातील.
अर्ज फी – सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस – रु 25
SC, ST आणि दिव्यांग – 0















Discussion about this post