गडचिरोली । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटला नसून मात्र लवकरच उमेदवारांची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळेल याकडे लक्ष लागून आहे. अशातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या धर्मरावबाबा अत्राम यांनी मी जर निवडून आलो नाही तर मोदींच्या ‘400 पार’चे स्वप्न पूर्ण होणार नाही असं वक्तव्य केलं. गडचिरोलीची जागा ही राष्ट्रवादीलाच मिळणार आहे, मी कमळावर लढलो तर ते अजितदादांनाही चालणार नाही असंही ते म्हणाले.
अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा अत्राम हे गडचिरोली या मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र या जागेवर भाजपचा दावा आहे. गडचिरोलीमध्ये सध्या भाजपचा खासदार आहे. मात्र या जागेवर अजित पवारांच्या गटातील धर्मराव बाबा अत्राम यांनी दावा केला आहे. ते म्हणाले की, “लवकरच आज रात्री किंवा उद्या उमेदवारांची यादी जाहीर होईल.
मला अपेक्षा आहे की मला उमेदवारी मिळेल. या ठिकाणाहून महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. मी कमळावर लढले पाहीजे असं दादांचंही मत नाही. गडचीरोलीची जागा आम्हाला मिळाला हवी. मोदीजींचा नारा आहे 400 पार. भाजपचे 399 झाले आणि माझी एक सीट आली नाही तर ‘400 पार’चे स्वप्न कसं पूर्ण होणार.” असं ते म्हणाले
Discussion about this post