जळगाव । केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुण्यासाठी विमानसेवा सुरू करण्यास ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीला भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात डीजीसीएकडून (दि. ६) परवानगी मिळाली आहे.
यामुळे आता फ्लाय ९१ कंपनी या महिना अखेर जळगावहून विमान सेवा सुरू करणार आहे. ही विमान कंपनी पुणे, हैदराबाद व गोवा या शहरांसाठी सेवा पुरवणार आहे. प्रथम गोवा येथे विमानसेवा सुरू होणार आहे. पुणे व हैदराबाद येथे विमानतळावर जसजसे स्लॉट मिळतील तसतशी सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली.
जळगाव विमानतळावर आधी जळगाव-अहमदाबाद, मुंबई अशी सेवा ‘टू जेट’ या विमान कंपनीने सुरू केली होती; परंतु तीन वर्षांपासून विमानसेवा बंद आहे. यातच फ्लाय ९१ कंपनीने जळगाव विमानतळावरून सेवा सुरु करण्यासाठी तयारी दर्शवली. यासाठी भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात डीजीसीएकडून बुधवारी (दि. ६) परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच जळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे.
Discussion about this post