नवी दिल्ली | २०२४ च्या लोकसभेसाठी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी भाजपचे नेते दिल्लीत गेले असून त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे भाजप तब्बल 37 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर शिंदे गटाला 8 आणि अजित पवार गटाला केवळ 3 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मात्र अशातच महायुतीतील मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, असं स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. परंतु महायुतीच्या जागावाटपाबाबत माध्यमांत आलेले आकडे हे चुकीचे आहेत”, अशी माहिती स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिली
मीडिया स्वत:हून ठरवत आहे की, एवढ्या जागा मिळणार, तेवढ्या जागा मिळणार ते बंद केलं पाहिजे. ही न्यूज धादांत चुकीची आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “आपण भाजपच्या पहिल्या यादीच्या वेळी पाहिलं असेल जिथे युती आहे त्याठिकाणीची नावे यादीत आली नाहीत. कारण युतीतल्या पक्षांसोबत चर्चा करुन उमेदवार जाहीर करायचे असतात. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये फक्त भाजप पक्ष लढतो तिथल्या जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आता महायुतीचे राज्यांच्या उमेदवारांची देखील माहिती समोर येईल. योग्यवेळी सर्व माहिती मिळेल. आमचे जे काही निर्णय होतील ते आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवूच”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
दरम्यान, महाराष्ट्रातील महायुतीची अंतिम जागावाटपाची बैठक दिल्लीतच होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या हायकमांडचे दिग्गज नेते असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Discussion about this post