जळगाव | “ सायकल चालवा व तंदुरुस्त रहा” असा संदेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे यांनी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीला झेंडा दाखवितांना दिला.
यावेळी रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे उपस्थित होते. प्रा.इंगळे पुढे म्हणाले की, सायकल चालविल्यामुळे व्यायाम होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हार्ट अटॅक, मधुमेह, लठ्ठपणा यासारखे आजार कमी होण्यास मदत होते. सायकल चालवणाऱ्या लोकांना निसर्गातील शुध्द हवेचा पूरवठा होतो. त्यामुळे त्यांची फुफ्फुसे अधिक चांगल्या पध्दतीने कार्यरत राहतात. सायकलचा वापर मोठया प्रमाणात केल्यास इंधन बचत होऊन प्रदुषणास आळा बसेल आणि सायकल चालविल्याने शरीरालाही फायदा होईल.
त्यामुळे सर्वांनी सायकलचा वापर करुन निसर्ग वाचवावा असे आवाहनही केले. प्रा.इंगळे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीचा प्रारंभ केला. या सायकल रॅलीमध्ये शिल्पा मंडोरे, राम घोरपडे, आशा चोपडे, रसिका भोळे, दीपमाला काळे, जयश्री पाटील, गायत्री चौधरी, रेणूका हिंगू, कामिनी धांडे, स्वप्नील मराठे, निलेश चौधरी, राजू मराठे, राजू सोनवणे, प्रशांत पाटील, इरफान पिंजारी, आदर्श पाटील, तेजस वाणी, चंद्रकांत महाजन, डॉ.सुयोग सोमाणी, दिनकर सरोदे, कैलास औटी, स्वप्नील कुंवर, अरुण सपकाळे, शिवाजी पाटील, अभिमन्यू पवार, गंजीधर पाटील, बिऱ्हाडे व रासेयो स्वयंसेवक व सायकलपटूंचा समावेश होता. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.
Discussion about this post