जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय समाज पक्षाने दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे असं पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतेय.
दरम्याम त्यावर विविध प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आज एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत.
एकनाथ खडसे आज पंकजा मुंडे यांना भेटणार आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर जाणार आहेत. याभेटीदरम्यान खडसे-मुंडे भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
काय म्हणाले खडसे?
भाजप पक्ष वर्षांवर्ष ज्यांनी वाढवला. बहुजनांपर्यंत पोहोचला. अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होतोय,
पंकजा मुंडे यांचं विधान दुःखद आणि वेदनादायी आहे, असं एकनाथ खडसे म्हणालेत. गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी उभा आयुष्य घातलं. पंकजा मुंडे यांची अशी अवस्थता असणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?
भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे. मुंडे साहेब होते तेव्हा छोट्या-छोट्या माणसांना घेऊन बनवलं. तेव्हा पक्षाने सत्तेचं तोंड पाहिलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Discussion about this post