बालासोर : ओडिशामधील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देश हदरला आहे. या अपघातात आतापर्यंत 288 जणांव्हा गेली असून 1000 हून अधिक जखमी झाले आहे. दरम्यान, पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने शनिवारी एक दिवसाचा शोक जाहीर केला.
बालासोर येथे काल संध्याकाळी देशातील आजवरचा सर्वात मोठा रेल्वे अपघात झाला आहे. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते.
या दुर्देवी आणि भयंकर अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. तसेच अपघातात आतापर्यंत 100 प्रवासी जखमी झाले आहेत. कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
अपघात झाला तेव्हा या अपघातात 50 ते 70 लोक दगावल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशिरा हा आकडा 120 वर पोहोचला. तसेच जखमींचा आकडाही 350 वर गेला. मात्र, सकाळपर्यंत मृतांचा आकडा 288 आणि जखमींचा आकडा 1000 झाला आहे. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Discussion about this post