सुका मेवा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण अंजीर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? होय, अंजीर हे एक फळ आहे जे कच्चे आणि कोरडे दोन्ही प्रकारे खाल्ले जाऊ शकतात. आपल्यापैकी अनेकांना दिवसाची सुरुवात ही हेल्दी पदार्थांपासून सुरु करायची असते. त्यातील काहीजण सकाळची सुरुवात ही ड्रायफ्रूट्सने करतात.
अंजीर हा ड्रायफ्रूट्स मधला महत्त्वाचा घटक असून यामध्ये मॅग्नेशियम, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक आढळतात. आयुर्वेदानुसार अंजीर पित्त रोगांचा नाश करते. ज्यामुळे पोट, हृदय आणि मेंदूच्या आजारांवर फायदेशीर आहे.नियमितपणे सकाळी अंजीरचे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतील. यामुळे वजन नियंत्रणात राहाते. तसेच मधुमेह देखील नियंत्रणात राहाण्यास मदत होते. जाणून घेऊया इतर अनेक फायदे.
अंजीर खाण्याचे फायदे
अंजीरमध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ऍसिड असते जे हृदयविकारांना प्रतिबंध करते.
अंजीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील चांगले असते. हे हाडांसाठी चांगले टॉनिक आहे. यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधे निरोगी राहाण्यास मदत होते.
अंजीरमध्ये पोटॅशियम असल्यामुळे ते रक्तातील साखर नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन केल्यास फायदा होतो. परंतु, याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात तंतू आढळतात. जे औषधांप्रमाणे काम करते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तसेच ज्यांना पाईल्स किंवा स्टोनचा त्रास असेल त्यांना देखील अंजीर खाल्ल्याने फायदा होईल.
पांढऱ्या डागांवर अंजीराच्या पानांचा रस किंवा अंजीरचे दूध लावल्यास फायदा होतो.
२ महिने नियमितपणे बडीशेपबरोबर अंजीर चावून खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढण्यास मदत होते. तसेच वजन लगेच वाढते.
अंजीर आणि मनुके दुधात उकळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो, आतड्यांवरील सूज कमी होते. अशक्तपणा दूर होऊन फुफ्फुसांना ताकद मिळते.
टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Discussion about this post