मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडी मध्ये जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटला आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने मविआकडे 27 जागांचा प्रस्ताव समोर ठेवलाय. याप्रस्तावामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढणार की सुटणार? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय.
वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीतील आतापर्यंत झालेल्या चर्चेत घटक पक्षाच्या वाट्याला संभाव्य जागांवर वंचितने दावा केला आहे.
यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचा आणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने मागणी केली आहे. तर 48 पैकी शिवसेना एकूण वीस जागांवर निवडणूक लढवणार ठाम आहे.
Discussion about this post