जळगाव । राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी जाणवत आहे तर, कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. अशातच राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
धुळे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या दरम्यान 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह, गारपीट होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे मुंबई वेधशाळेचे आवाहन.
28 फेब्रुवारी ते 1 मार्च असे तीन दिवस खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सोलापूर अशा १० जिल्ह्यात ढगाळ वातावरण सहित तुरळ ठिकाणी विजांच्या गडगडाटासह किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. यादरम्यान उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर अशा पाच जिल्ह्यात व त्या लगतच्या परिसरात आजपासून ते एक मार्चपर्यंत असे तीन दिवस गारपीटीची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Discussion about this post