मुंबई । संगीत विश्वातून एक दुखःद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायक पंकज उदास यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीत जगतावर शोककळा पसरली आहे.
भारतातील उत्कृष्ट गझल गायक म्हणून पंकज उदास हे प्रसिद्ध होते. पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला होता. 1980 ते 1990 च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मधुर आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
Discussion about this post