पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज 2 जून जाहीर केला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली. यंदा दहावीचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला असून कोकण विभागाचा निकाल ९८.११ टक्के उत्तीर्णतेसह अव्वल ठरला आहे. तर यंदा दहावीच्या निकालात नागपूरची मुलं मागे पडलीयेत.
नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. नागपूरमध्ये दहावीचा निकाल ९२.०५ इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तीन टक्क्यांनी घटला आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तिर्णतेचे प्रमाण ३.८२ टक्क्यांनी जास्त आहे.
विभागीय निकाल
पुणे: ९५.६४ टक्के
नागपूर: ९२.०५ टक्के
औरंगाबाद: ९३.२३ टक्के
मुंबई: ९३.६६ टक्के
कोल्हापूर: ९६.७३ टक्के
अमरावती: ९३.२२ टक्के
नाशिक: ९२.२२ टक्के
लातूर: ९२.६७ टक्के
कोकण: ९८.११ टक्के