यवतमाळ । राज्यातील भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत पुन्हा मोठं भाकीत वर्तवलं आहे.विशेष म्हणजे त्यांनी याअगोदर गिरीश महाजन यांनी भाकीत वर्तवल्यानंतर काँग्रेसचे तीन बडे नेते फुटले होते. त्यानंतर आता येत्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोट होणार, असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“मी मागच्या वेळस सांगितले स्फोट होणार आहे. त्यावेळेस काँग्रेसमध्ये स्फोट झाला. याबत त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. ते दिवाळी, दसरा सणात कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येत असतात. त्यामुळे ती कौटुंबिक भेट असेल. या सुप्रिया सुळे आणि अजित दादा भेटी संदर्भात अजित दादा सांगू शकतील. राज्यात आठ दिवसात पुन्हा स्फोट होण्याची शक्यता आहे”, असंही भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन तुतारीची चिन्हावर गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली. “ती तुतारी प्राण पणाने फुंकावी आणि महाराष्ट्रात घेऊन फिरावी. ह्याच त्यांना आमच्या सदिच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांची मशाली पेटणार नाही आणि पवार साहेबांची तुतारीही आवाज करणार नाही”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
Discussion about this post