जळगाव । एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये यावं असं आवाहन त्यांच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी केलं होतं. त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे सुनेच्या आग्रहाला एकनाथ खडसेंनी काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले होते. अशातच यावरून एकनाथ खडसेंनी प्रतीक्रिया दिली आहे.
दरम्यान रक्षा खडसे या भाजपमध्ये असल्याने त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केलीय. मात्र आज तरी मला भाजपमध्ये प्रवेश करायचा नसल्याचं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलं. शरद पवार यांचे नेतृत्व मी मान्य केला आहे, त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिलीय. तर ईडीसीबीआय यातून सुटका मिळण्यासाठी एकनाथ खडसे हे भाजप जाणार असल्याची चर्चा आहे मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर ईडीसीबीआय यातून सुटका मिळाली असती तर यापूर्वीच भाजपच गेलो असतो. त्यासाठी संघर्ष केला नसता तसेच अजित पवार ज्यावेळी वेगळे झाले तर कदाचित अजित पवार यांच्याबरोबर जाणं पसंत केलं असतं. मात्र तसं न करता आपण संघर्ष करत राहणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. भाजपने अनेक वर्ष काम केलं परंतु काही कारणास्तव मला भाजपचा त्याग करावा लागला.
आता आपण शरद पवार यांचे नेतृत्व मी मान्य केला आहे त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं खडसे म्हणाले. जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभमतदारसंघासाठी आपले नाव चर्चेत आहे. त्याला शरद पवार आणि जयंत पाटील यांची मान्यताही आहे. मात्र आपल्या आजारपणाचा विचार करता डॉक्टरांचा सल्ल्याने आपण पुढील निर्णय घेणार असल्याचं खडसे म्हणालेत.
Discussion about this post