जळगाव । भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करत आहेत. एकनाथ खडसेंनीही भाजपत यावं ही सर्वांची इच्छा असल्याचं सूचक वक्तव्य भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी केलं. रक्षा खडसे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी धमाका करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरु आहे. आता भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची तयारी सुरु असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांनी सूचक वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
रक्षा खडसे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे भाजपामध्ये दाखल होत आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही आपली व सर्वांची इच्छा आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Discussion about this post