नवी दिल्ली । एकीकडे शेतकरी आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल २५ रूपयांनी वाढ होणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ऊसाची एफआरपी 25 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. ही वाढ मोदी सरकारने केलेली सर्वाधिक वाढ आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारनं निवडणुकीपूर्वी देशातील 5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. हे 5 कोटींहून अधिक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आहेत. सरकारने बुधवारी 2024-25 हंगामासाठी ऊसाची एफआरपी 25 रुपयांनी वाढवून 340 रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली आहे.
Discussion about this post