वडूज : सध्याच्या युगात ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाने संपूर्ण जग बदलत आहे. शिक्षण क्षेत्रातही सातत्याने नवीन बदल होत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातही मोठे आमूलाग्र बदल होणार असल्याने शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सकारात्मक राहावे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. डी. के. म्हस्के यांनी व्यक्त केले.येथील दादासाहेब जोतिराम गोडसे कॉलेजच्या वतीने भिलार (ता. महाबळेश्वर) येथील केंब्रिज स्कूलमध्ये “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संधी व आव्हाने” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी डॉ. म्हस्के बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे होते. या वेळी सातारा महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेनकुदळे, मुंबईच्या डॉ. होमी भाभा स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. वसंतराव हेळवी, केंब्रिज एज्युकेशन सोसायटीच्या सचिव श्रीमती मरिअम्मा पोथन पायमपल्लील, प्रा. डॉ. सुधीर भटकर, प्रा. डॉ. विराज महाजन, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, प्रा. डॉ. ओमप्रकाश जाधव, प्रा. डॉ. पी. डी. कांबळे, प्रा. डॉ. अर्चना सूर्यवंशी, प्राचार्य राजेंद्र मोरे उपस्थित होते.या वेळी प्रा. डॉ. हेळवी, डॉ. मेनकुदळे व श्री. गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीची व महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. सुदाम खाडे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक प्रा. बाबासाहेब साबळे यांनी आभार मानले.
चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी समारोपासाठी मंत्रालय, मुंबई येथील वित्त विभागाचे उपसचिव बी. आर. माळी तसेच वित्त विभागाचे शिवानंद माळी हे उपस्थित होते. तर पाचगणी येथील मेहता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन देसाई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
समारोपाच्या प्रारंभी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना वित्त विभागाचे उपसचिव बी. आर. माळी म्हणाले की, शैक्षणिक विकासासाठी अशा प्रकारचे चर्चासत्र अत्यंत आवश्यक आहे. अशा चर्चासत्रातून प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची गरज आहे.यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर नितीन देसाई म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करून त्याप्रमाणे वाटचाल करावी. या नवीन शैक्षणिक धोरणाचा समाजाला निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली. समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाबासाहेब साबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुधीर भटकर केले.तर आभार डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी मानले. या चर्चासत्रात महाराष्ट्रातील तसेच गोव्यामधील महाविद्यालयाचे अनेक प्राध्यापक उपस्थित होत.
Discussion about this post