कोल्हापूर । सध्या अल्पवयीन मुलांमध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असताना दिसत आहे. यातच नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही धक्कादायक घटना कोल्हापूर शहरातून समोर आली आहे. आर्यन देवीदास पालवे (वय १५ वर्ष) असं मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनची चाचणी परीक्षा सुरू असल्यामुळे तो तणावात होता. काल म्हणजेच सोमवारी दुपारी त्याची आई घरी आल्यानंतर आर्यन त्याच्या बेडरुममध्ये होता. त्याला हाक दिल्यानंतरही त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आईने त्यांच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला.
तेव्हा आर्यनने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आर्यनचे वडील बँकेत अधिकारी आहेत, तर आई शिक्षिका आहे. तो इयत्ता नववीत शिकत होता. त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Discussion about this post