नवी दिल्ली । केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी कांदा निर्याती प्रकरणी मोठा निर्णय घेतलाय.सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय. केंद्राने ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय.
दरम्यान, एका दिवसापूर्वी गुजरातमधील पांढरा कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली होती. यानंतर देशभरातील आणि महाराष्ट्रातील शेतकरी केंद्र सरकारवर नाराज झाले होते. सरकारवर चहुबाजूंनी टीका केली जात होती. त्यानंतर केंद्र सरकारने आज महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आलीय.
सरकारच्या या निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयावर शेतकरी नेते अजित नवले यांनीही प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन केलं जातं. ज्यावेळी निर्यात बंदी करण्यात आली होती, तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांदा निर्यातस बंदी उठवण्याची मागणी केली होती, त्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं होतं. त्याचवेळी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गुजरातच्या कांद्याला निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर इतर राज्यातून टीका केली जात होती. त्याचाच परिणाम म्हणून केंद्राने ही निर्यात बंदी उठवलीय. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निकालावर परिणाम होईल,यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं नवले म्हणालेत.
Discussion about this post